मी काम करत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये भौगोलिक वैविध्य आहे. शहरी, निमशहरी, ग्रामीण आणि दुर्गम असे सर्वच भाग या मतदारसंघात येतात. वैविध्याची हि समृद्धी लक्षात घेऊनच मी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी एक स्वप्न अर्थात व्हिजन डोळ्यासमोर ठेवले आहे. यामध्ये कृषी क्षेत्रासाठी प्रोत्साहन, पायाभूत सुविधांचा सर्वंकष विकास, सर्वांसाठी खुले असणारे रोजगारभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षण, दळणवळण व संपर्काच्या उत्तम सुविधा, वंचित समाजघटकांना संधी व न्याय आदींचा प्राधान्याने समावेश आहे. याशिवाय सर्वांसाठी शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, उद्यमशिलतेला प्रोत्साहन आणि रोजगारनिर्मिती, निमशहरी भागांचा सर्वंकष विकास आदी प्रमुख मुद्यांचा समावेश आहे. जनतेच्या हितासाठी आणि त्यांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी जे काही करण्यासारखे आहे, ते करण्यासाठी मी सदैव कार्यरत आहे.