नमस्कार मित्रांनो बंधु-भगिनिंनो,
आपल्या जवळ काही नसताना दुस-याला देण्यासाठी एकच वस्तु आहे… ती म्ह्णजे सुख! हे सुख मला सर्वसामान्य बांधवा पर्यंत, युवकां पर्यंत कसे पोहचवता येईल या साठी मी सतत प्रयत्न करत राहिल, उस्मानाबाद जिल्ह्याच्या ओसाड माळरानाकडे बघताना यातुन आपले शैक्षणिक रित्या उस्मानाबाद जिल्हयाचे नंदनवन करण्याचे स्वप्न साकार होईल का? असे मनात येताच उस्मानाबाद,तुळजापूर,परांडा, वाशी ,कळंब येथे १९९५ पासुन सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या नोकरीवर असले पाहिजे हे स्वप्न ठेवणार्या प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते हेच स्वप्न मनात ठेवून शिक्षण संस्थेची स्थापना करून आजपर्यंत लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन विविध पदावर,नोकरिवर कार्यरत आहेत, हाच मनस्वी आनंद आहे,बघता बघता हजारो हाथ शैक्षणिक संकुलामध्ये नोकरीच्या माध्यमातून कामाला आले आणि हे शैक्षणिक नंदनवन उभे राहिले.
शिक्षण प्रसारक म्हणून वडील डॉ. वेदप्रकाश पाटील यांचे सतत मार्गदर्शन कायम आठवण करून देते,या सामाजिक, शैक्षणिक कार्याच्या माध्यमातून अनेक नाही तर हजारो संसार उभे राहिले.हे फक्त वडील आदरणीय भाऊ मुळेच माणुस अन माणुस त्यामुळे कळला.
गेली अनेक वर्ष समाजकारणाचा व राजकारणाचा वसा मला माझे आजोबा लोकनेते बाबुराव आण्णा पाटील अनगरकर या देव माणसांकडुन घेता आला. त्यांनी केलेले काम आपण सर्व जाणताच.त्याचप्रमाणे वडील मा.कुलगुरू आदरणीय डॉ.वेदप्रकाश पाटील यांच्या मनात कायम ध्यास कि आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्चशिक्षित होऊन डॉक्टर, आधिकारी झाला पाहिजे ,मोठ्या कंपनीमध्ये नोकरी केली पाहिजे,शैक्षणिक क्षेत्रात केलेली क्रांति आपण जाणताचं,त्यांचे कार्य,कर्तव्य जनमाणसांना ज्ञात आहेच. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत, त्यांच्या कर्तव्याचा वारसा समर्थपणे पुढे चालविण्यासाठी,उस्मानाबाद च्या शैक्षणिक, सामाजिक विकासात नवे आयाम प्रात्प करुन देण्यासाठी, येथील युवा, जेष्ठ, आणि शेतकरी, मजुर, कामगार आणि सर्व नागरीकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी, उस्मानाबाद चे नाव जगाच्या नकाशावर अधिक ठळक करण्यासाठी, मी डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील आपल्या समोर येत आहे.
मी आजवर केलेल्या छोट्या – मोठ्या सामाजिक, शैक्षणिक, राजकिय केलेले कार्य, वाडवडीलांचे संस्कार आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभलेले सहकारी मित्रांचे मार्गदर्शन,आशिर्वाद मला कायम असूद्यात…..!!!
लहानपणापासुन मी २०% राजकारण आणि ८०% समाजकारणाच्या वातावरणात वाढलो. आमचे आजोबा मा.आमदार मोहोळ बाबुराव आण्णा पाटील आणि माझे वडील आदरणीय डॉ. वेदप्रकाश पाटील हे समाजकारण व राजकारण,आणि शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातुन सर्व सामान्यांची सेवा करत आले. त्यांनी केलेली विकास कामे आपण सर्व जाणताच. त्यांचे कार्य सर्व जनसामान्यांना ज्ञात आहे. त्यांच्या सेवेचा व कर्तव्याचा हा वारसा सक्षमपणे पुढे चालवण्यासाठी धनेश्वरी शिक्षण समुहाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि छत्तीसगढ येथील आदिवासी भागांत सर्वसामान्य, ग्रामीण भागातील नागरिकांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी, येथील युवा, जेष्ठ आणि सर्व नागरिकांचे, प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकूणच स्वराज्याचे स्वप्न ज्या आपल्या रयतेच्या राजाने पाहिले, ज्या राज्याचा पदस्पर्शाने पावन झालेल्या उस्मानाबाद जिल्हायाचे नाव जगाच्या नकाशावर अधिक ठळक करण्यासाठी मी डॉ. प्रतापसिंह पाटील आपला एक नम्र सेवक म्हणून आपल्या समोर येत आहे. जगावं कस हे आपल्याला संत महात्म्यांनी शिकवलं परंतु मानुस म्हणून काम करावं कस हे माझ्या वाड वडीलांनी आणि जेष्ठांनी शिकवलं! आपना समोर येण्याची संधी आदरनीय डॉ. वेदप्रकाश पाटील म्हणजे माझे वडील यांच्यामुळे प्राप्त झाली. ही संधी म्हणजे मी आजवर केलेल्या छोट्या-मोठ्या सामाजिक, शैक्षणिक, राजकिय कार्याची घेतलेली एक मोठी दखल आहे. या मागे माझ्या आई -वडीलांनी केलेले संस्कार आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभलेले सहकारी मित्रांचे मार्गदर्शनाचा सिंहाचा वाटा आहेच. परंतु शेतकरी, तरुण सहकारी, आणि तुमच्या शुभेच्छा व आशिर्वादा शिवाय हे कसे शक्य आहे? तेव्हा अगदी मना पासुन मी सर्वाना सलाम करतो.
माझा मराठीचा बोलु कौतुके! परि अमृतातेही पैजा जिंके!! अशी ही माझी मराठी माती. नव्या वाटा शोधणारे, नव निर्मितीला जोपासणारे, अशक्य ते शक्य करुन दाखविणारे, अहोरात्र झटणारे, अहोरात्र लढणारे, प्रत्येक मराठी मनाचा अभिमान असणारे छ्त्रपती शिवराय,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुन्य पावन झालेला उस्मानाबाद जिल्ह्याचा महिमाच वेगळा. सर्व जाती भेद दूर करुन शाहु – फुले – आंबेडकर यांनी मानसाच्या विकासाची लढाई लढली, म्हणुन या भुमीचा व येथील प्रत्येकाचा विकास साधणे, त्यांच्या हक्कासाठी लढणे हे मला माझे कर्तव्य वाटते.उस्मानाबाद सारख्या भुमीत जन्माला आल्याचा मला अभिमान वाटतो.
‘पायाने चालणारी माणसे फक्त जमिनीवरुनच चालत राहतात परंतु योग्य नियोजन करुन बुध्दिने चालणारी मानस आभाळात झेप घेऊन इतिहास घडवितात. म्हणुन तर बदलत्या काळा बरोबर काही प्रश्नांकडे नव्या दृष्टीने बघण्याची गरज आहे. शेतकरी आणि कष्टकरी यांचा विकास, युवकांसाठी रोजगार, शेतीचे आधुनिकीकरण, आरोग्य, शिक्षण, महिलांचे सक्षमीकरण अशा अनेक प्रश्नांवर दीर्घकालीन उपाय करण्याची आज आवश्यकता आहे. कोणत्याही प्रकारची भेदभावाची दरी न करता समान दृष्टीकोन असण्यासाठी सर्वांच्या साथीने आपणास विकासाचा लढा लढायचा आहे. त्या साठी हवी आपली साथ!
एक वेळ आपला विकास झाला नाही तरी चालेल परंतु या जिल्ह्यातील सर्वसामान्य माणूस जगला पाहिजे, माझा शेतकरी बांधव अभिमानाने ताठ उभा राहिला पाहिजे, असे समाजकारणाचे बाळकडु मला लहानपणीच माझे आजोबा बाबुराव आण्णा पाटील अनगरकर आणि वडीलां मार्फत मिळाले. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, या न्यायाने जनसेवेचे, दिनदुबळ्यांच्या मदतीचे गरजुंना शक्य ती मदत करण्याचे संस्कारही लहानपणीच रुजले. मनातुन विचार बाहेर पडले. विचारातुन स्वभाव घडत गेला, त्यातुन समाजकार्याची गोडी लागली. अनेक कामे मेहनतीतुन घडु लागली. समाजकारण करण्यासाठी व लोक विकास साधण्यासाठी राजकारण हे एक प्रभावी माध्यम असल्याची मला जाणीव झाली. उणीवां शिवाय जाणीव निर्माण होत नाही आणि जाणीवे शिवाय कार्य अधुरे राहु शकते म्हणुन तर जाणीवेतुन मोठ्या पटलावर कार्य करण्यासाठी व आपल्या विकासासाठी मी सदैव कटिबध्द राहील.
अंधारातुन प्रकाशाकडे जाताना, मला गरज आहे तुमच्या सोबतीची, तुमच्या अनमोल विचारांची ! तुमचं व माझ नात विचारांनी व सामाजीक विकासाने दृढ करण्यासाठी मी उत्सुक आहे. माझ्या परिवाराने कोणाची ही प्रतारणा केली नाही. हव्यास, लोभ या पासुन तर आम्ही किती तरी दुर आहोत. आमच्या परीवाराला मानसे जोडायला आवडतात, मानसांशी नाती जोडायला आवडतात, जोडलेली नाती जपायला आवडतात. कारण माझा विश्वास आहे की आपण कमावलेली संपत्तीही आपण बरोबर घेऊन जाणार नाही. परंतु आपण जोडलेल्या मानसांच्या डोळ्यातील अश्रुचा एक थेंब हाच आपल्या करीता लाख मोलाचा दागिना आणि यासाठी मानसांशी जोडलेले हे नाते आपल्यासाठी अनमोल असेल! धन्यवाद!
सदैव,आपला
डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील.