उस्मानाबाद जिल्हयाच्या राजकीय क्षेत्रातील एक अत्यंत कर्तबगार, कणखर व कुशल नेतृत्व! तळागाळातल्या कार्यकर्त्यांना ओळखणारा, जनतेच्या प्रश्नांची अचूक जाण असलेला दूरदर्शी, पारदर्शी आणि सामान्यांना आपला वाटणारा जाणता जनसेवक म्हणजे भैय्यासाहेब .
सामान्यांना आपलेसे करणे ही मोठी कठीण गोष्ट असते. भैय्यासाहेब ती लिलया जमते; कारण ते जनसामान्यांच्या प्रश्नसमस्यांना मनापासून भिडतात. लोकांच्या गरजा ओळखून प्रश्नांना उत्तरे शोधण्याच्या कामात गढून गेलेले भैय्यासाहेब त्यांच्या हरएक कृतीकार्यातून बघायला मिळतात. असाच नेता लोकांना ‘आपला’ वाटतो. कारण या नेत्याच्या शब्दांत पोकळ आश्वासन नसते तर प्रयत्नांच्या पूर्ततेची खात्री असते. कारण स्वत: भैय्यासाहेबना जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असते तेव्हाच एकत्रित जनशक्तीची जाणीवही असते.
डॉक्टर प्रतापसिंह पाटिलशी उद्याच्या उस्मानाबाद विषयी सुस्पष्ट असे भविष्यांकन आहे. आतापर्यंत काय झाले, राज्यकर्त्यांकडून कोणत्या चुका झाल्या, प्रगती कशी रोखली गेली, भविष्यात काय काय व्हायला पाहिजे, या संदर्भात खास त्यांचा स्वत:चा असा दृष्टिकोन आहे. या दृष्टिकोनामुळेच, टीका झाली तरी तिच्यावर मात करून पुढे जाण्यातील सातत्य ते राखू शकतात.