विकासाच्या ‘उस्मानाबाद पॅटर्न’ ची व्याख्या भैय्यासाहेब अशी ,
‘सर्व प्रकारच्या अडथळ्यांशी सामना करीत प्रतिकूलतेस समोरासमोर भिडणे म्हणजे ‘उस्मानाबाद पॅटर्न!’
उस्मानाबादचे वार्षिक पर्जन्यमान आहे अवघे आठ इंच!
जवळपास ७० टक्क्यांहून अधिक क्षेत्र अवर्षणग्रस्त आहे. असे असूनही या परिसरात आज 06 साखर कारखाने उभे आहेत. इथे तयार होणाऱ्या साखर नित्य निर्यात होते.
संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन उस्मानाबाद मध्येच होते. सर्व प्रकारच्या अडचणी, प्रतिकूलतांचा सामना करीतच हे सारे साध्य केले गेले आहे.
गेल्या काही काळात कृषिक्षेत्राला लक्षणीय यश लाभत असले तरी शेतकरी व कृषी शास्त्रज्ञांमधील संवाद आता वाढायला हवा असे डॉ. प्रतापसिंह पाटीलाचे मत आहे. कृषिक्षेत्रासमोरील अनेक आव्हाने त्यांना खुणावत आहेत. अन्नसुरक्षेवरील वाढता दबाव जाणवतो आहे. उत्पादन आणि विक्री आघाड्यांचा समन्वय किती आवश्यक आहे याचे संपूर्ण भान त्यांना आहे.
‘कृषिक्षेत्रात होणारे संशोधन स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीस प्राधान्य देणारे व शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञानाचे धडे देणारे असले पाहिजे. त्यासाठी शेतकरी, शास्त्रज्ञ व संलग्न क्षेत्रांतील सर्व कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात सहकार्य गरजेचे आहे.
अन्नधान्य, बागायती पिके, पशुधन, मच्छिमारी आणि संबंधित क्षेत्रांतील उत्पादन व उत्पादनकता वाढविण्यासाठी आपल्याला योग्य तंत्रज्ञान विकसित करावे लागणार आहे. त्या दृष्टीने टाकलेली पावले –
ऍग्रिकल्चरल महाविद्यालय व रिसर्चची संस्था ची स्थापना.
सध्या या संस्थेच्या 25 इन्स्टिट्यूट्स देशाच्या कानाकोपऱ्यात काम करीत आहेत.
16 कृषी विद्यापीठे व 12 अॅग्रिकल्चरल तंत्रविदलाय कार्यरत आहेत. पारंपरिक ज्ञान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ त्यातील ज्ञानप्रणालीत आढळून येतो. स्थानिक प्रश्नांवर शेतकरी स्वत: काही कल्पक उपाय शोधून काढत असतात. त्यांची शास्त्रशुध्द तपासणी व विकसन यावर पाटीलसाहेब भर देतात.
कोणत्याही बाबीचा सर्वांगीण विचार कसा करावा याचा वस्तुपाठच डॉ. प्रतापसिंह पाटीललांकडून बऱ्याच वेळा शिकायला, अनुभवायला मिळतो.
शेतकरी शहराकडे न वळता गावात राहावा यासाठी काय करता येईल? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न मराठवाडाला सातत्याने भेडसावत आलेला आहे.
. एकीकडे शेतीला महत्त्व देत असतानाच ते शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा आणि उदरनिर्वाहाचा विचार करतात.
‘शेतकरी गावात राहावा यासाठी सर्वांत प्रथम, शेतकऱ्याने सर्वकाळ आणि सर्वतोपरी शेतीवरच अवलंबून राहावे, हा विचार आता सोडावा लागेल. मुळात गावातील त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न का निर्माण झाला?
– शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या वाढली.
– शेतीचे दरडोई अथवा दर कुटुंबामागील क्षेत्र घटले.
– जमिनीची उपलब्धता कमी झाली.
– शेतीमध्ये खासगी तशीच सरकारी गुंतवणूक कमी झाली.
– शेती व्यवसायाच्या विस्तार-विकासासाठी आवश्यक असणार्या पायाभूत सेवासुविधा पुरविल्या गेल्या नाहीत.
‘मूलभूत प्रश्न सुटले तर शेतकरी गावात राहील ना? पाण्याची समस्या! ती सुटली तर पुढचे सारे प्रयत्न!
कोणतेही राज्य अथवा शहर विकसित करताना पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे लागते आणि त्याचा विपरित परिणाम शेतीवर होतो. ‘उस्मानाबाद पॅटर्न’ मुळे अनेक समस्यांना आळा बसतो.
डॉ. प्रतापसिंह पाटील कळकळीने शेतकऱ्यांना आवाहन करतात, ‘मला चिंता एका गोष्टीची आहे, की संकट आले, हाती आलेले पीक गेले त्यामुळे उद्विग्न शेतकरी चुकीचे पाऊल उचलतात. मी जवळपास संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यांत जाऊन आलो. संकट मोठे आहे. धैर्याने सामना करायचा आहे. घाबरून जीव गमवायचा आणि कुटुंबासमोर आणखी समस्या निर्माण करायच्या ही गोष्ट महाराष्ट्राची भक्कम परंपरा माहीत असणार्या व्यक्तीला शोभणारी नाही. संकटग्रस्त शेतकरी बांधवांनो, अतिरेकी व टोकाचा मरणाकडे जाणारा मार्ग अवलंबू नका. तुम्ही एकाकी नाही. एकटे नाही.’