सुरुवातीपासून खेळाच्या संघटनांना पाठिंबा देऊन संघटनात्मक पातळीवरती मजबुती आणून त्याचा खेळाडूंना कसा फायदा होईल यासाठी भैय्यासाहेबनी अथक प्रयत्न केले.
भैय्यासाहेब नेहमीच व्यापक स्तरावर विचार करतात. क्रीडा क्षेत्रही त्याला अपवाद नाही. खेळाचे महत्व जाणून राष्ट्रीय पातळीवर खेळ व खेळाडू यांना पुढे आणण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहीलेले आहेत. खेळाडूंचे व्यक्तीगत भले झाले पाहिजे ही बाब खेळाच्या संदर्भाने ते विचारात घेतात.